काळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानला जोधपूर कोर्टाकडून पुन्हा एकदा हजेरी माफी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड ॲक्टर सलमान खान (Salman Khan) ला शनिवारी (दि 16 जानेवारी) जोधपूर कोर्टात हजर राहायचं होतं. आता अशी माहिती आहे की, सलमान खानला कोर्टाकडून माफी मिळाली आहे. या प्रकरणी सलमानं जिल्हा आणि सत्र न्यायाधीशाच्या कोर्टात 16 वेळा हजेरी माफी मिळवली आहे. इतकंच नाही तर कोरोना काळातही त्याला हजेरी माफी मिळाली आहे. अशात पुन्हा एकदा सलमान कोर्टात उपस्थित राहिला नाही आणि पुन्हा एकदा त्याच्याकडून हजेरी माफी मागण्यात आली,जी कोर्टानं त्याला दिलीसुद्धा आहे.

पुन्हा एकदा कोर्टात गैरहजर राहिला सलमान
आता काळवीट शिकार आणि आर्म्स ॲक्टर प्रकरणी हजेरी माफी मिळाल्यानंतर जिल्हा आणि सेशन जिल्हा जज राघवेंद्र काछवाल यांच्या कोर्टात सुनावणी टळली आहे. आता येणाऱ्या 6 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा कोर्टा सुनावणी होईल. यासाठी हजर राहण्याचे आदेश सलमानला कोर्टाकडून देण्यात आले आहेत. यावेळी कोर्टात सलमानची बाजू वकिल हस्तीमल सारस्वत आणि निशांत बोड़ा यांनी मांडली होती.

आतापर्यंत 16 वेळा घेतलीय हजेरी माफी
एप्रिल 2018 मध्ये सलमान खाननं ट्रायल कोर्टात मिळालेल्या 5 वर्षांच्या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायाधीशाच्या कोर्टात आव्हान दिलं होतं. यानंतर तो एकदा कोर्टात हजर झाला होता. अडीच वर्षाच्या काळात याव्यतिरीक्त प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या कारणानं तो हजेरी न लावल्यानं माफी मागत आला आहे. समलानला वैयक्तिकरित्या हजर होऊन 437 ए चे मुचलके सादर करायचे आहेत. पंरतु त्यानं 16 वेळा हजेरी माफीचा लाभ घेतला आहे.

कोरोना काळात त्याला पहिल्यांदा 18 एप्रिल, दुसऱ्यांदा 4 जून आणि तिसऱ्यांदा 16 जुलै, चौथ्यांदा 14 आणि पाचव्यांदा 28 सप्टेंबर, सहव्यांदा 1 डिसेंबर रोजी हजर राहणं गरजेचं होतं. परंतु सलमानकडून कोरोनाच्या नावावर हजेरी माफी मागण्यात आली. कोर्टानंही कोरोना काळ लक्षात घेता प्रत्येकवेळी त्याला हजेरी माफी दिली. यानंतर आता 16 जानेवारी रोजी देखील त्याला हजेरी माफी देण्यात आली आहे.