सलमान खानच्या बंगल्यावर ‘वाँटेड’ गुन्हेगाराला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सलमान खानच्या गोराई येथील बंगल्यामध्ये केअरटेकरची नोकरी करणाऱ्या शक्ती सिद्धेश्वर राणा (वय-62) या सराईत आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. राणा हा 15 वर्षापासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र, तो सापडत नव्हता. हा आरोपी सलमान खानच्या बंगल्यात केअरटेकरची नोकरी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.

शक्ती सिद्धेश्वर राणा याच्यावर मारहाण आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यामध्ये त्याला जामीन मिळाल्यानंतर तो फरार झाला होता. जामीनाची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो पोलिसांकडे दिलेल्या पत्यावर आढळून आला नाही. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र, तो सापडला नाही. दरम्यानच्या काळात राणा हा सलमान खान याच्या गोराईतील बंगल्यावर केअरटेकर म्हणून कामाला लागला होता.

कोण आहे ‘राणा’ ?
शक्ती सिद्धेश्वर राणा हा 1990 च्या सुमारास वरळी भागात राहण्यास होता. या दरम्यान त्याने आणि त्याच्या इतर दोन साथिदारांनी एका घरात घुसून घरातील व्यक्तींना बेदम मारहाण करून जबरी चोरी केली होती. या गुन्ह्यामध्ये त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. एक वर्षानंतर त्याला जामीन मिळाला होता. जामिनावर सुटल्यानंतर तो न्यायालयात गैरहजर रहात होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. अटक वॉरंट जारी केल्यानंतर गुन्हे शाखेने त्याचा शोध सुरु केला होता. परंतु तो आपल्या कुटुंबासह वरळी येथून फरार झाला होता.

राणा हा सलमान खान याच्या बंगल्यामध्ये केअरटेकर म्हणून काम करत होता. तो आपल्या कुटुंबासह बंगल्यातील नोकरांच्या खोलीत राहत होता. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. राणाला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like