काळवीट शिकार प्रकरणात ‘भाईजान’ सलमान खानच्या अडचणीत वाढ !

जोधपुर : वृत्तसंस्था – काळवीट शिकार प्रकरणी सलमानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सलामन खानचा जामीन रद्द केला जाऊ शकतो. सध्या सुरु असलेल्या काळवीट शिकार खटल्याच्या सुनावणीसाठी सलमान खान हजर राहिला नाही. जोधपूर कोर्टाने सलमानला चांगलंच फटकारलं आहे. जोधपूर कोर्टाने म्हटले आहे की, “काळवीट शिकर प्रकरणी सुरु असलेल्या खटल्याप्रकरणी पुढील सुनावणीत जर सलमान खान कोर्टात हजर राहिला नाही तर त्याचा जामीन रद्द केला जाईल. सलमान खानला 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणी 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती. परंतु नंतर सलमानला जामीन मिळाला होता.

image.png

कोर्टाने नेमकं काय म्हटलं ?

काळवीट शिकार प्रकरणी कोर्टात आज झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने सलमानविरुद्ध कठोर भूमिका घेतली. सुनावणीदरम्यान गैरहजर असल्याने कोर्टाने सलमानला चेतावणी दिली आहे. कोर्टाने म्हटले की, “जर अभिनेता पुढील सुनावणीला कोर्टात हजर राहिला नाही तर त्याचा जामीन रद्द करण्यात येईल. आज(गुरुवार दि 4 जुलै) काळवीट शिकार प्रकरणी कोर्टात सुनावणी होती.

image.png

दोन प्रकरणाबाबत कोर्टात सुनावणी

आज झालेली सुनावणी दोन प्रकरणात होती. एक सुनावणी होती ती म्हणजे सलमान खानला झालेल्या 5 वर्षांच्या शिक्षेबाबत कोर्टात त्याने केलेल्या आवाहनाबाबत. दुसरी सुनावणी होती ती म्हणजे सलमान खानविरुद्ध आर्म्स अॅक्टनुसार, दाखल झालेल्या एका प्रकरणातील राजस्थान सरकारच्या आवाहनाबाबत. या सुनावणीसाठी सलमान खानने हजर राहणे अनिवार्य होते. परंतु सलमान कोर्टात हजर राहिला नाही. आता कोर्टाने सलमान खानला आदेश दिले आहेत की, या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. या दिवशी सलमान खान कोर्टात हजर राहिला नाही तर, त्याचा जामीन रद्द करण्यात येईल.

image.png

सैफ, सोनाली आणि नीलमलाही नोटीस

सलमान खान व्यतिरीक्त या केसमध्ये सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांचीही नावे आहेत. जोधपूर कोर्टाने या चौघांनाही आरोपांतून मुक्त केले होते. मागील वर्षी राजस्थान कोर्टाने त्यांना नवीन नोटीस पाठवली होती.

काँग्रेसचे आमदार अमिता चव्हाणांच्या मतदार संघातच काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

भटक्या विमुक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा !

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

ग्रामीण भागातील शेतकरी, दलित, अदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा- दिनकर पावरा