‘भाईजान’ सलमानच्या ‘दबंग 3’ ला मिक्स Reviews, कोणाला झाली ‘डोकेदुखी’ तर कोणी सांगितलं ‘ब्लॉकबस्टर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड स्टार सलमान खानच्या दबंग 3 सिनेमाची लोकांना प्रतिक्षा होती. नुकताच सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांनी सिनेमाला मिक्स रिव्ह्यु दिले आहेत. काहींना दबंग 3 ब्लॉकबस्टर सिनेमा वाटला तर काहींना हा सिनेमा बेकार वाटला. दबंग फ्रेंचाईजीचा हा तिसरा सिनेमा आहे.

https://twitter.com/MisfitKudi/status/1207773297519271937

बॉलिवूडच्या अनेक क्रिटीक्सनं दबंग 3 सिनेमाला चांगले रिव्ह्यु दिले आहेत. या रिव्ह्युच्या आधारावरच चाहते सिनेमा पाहण्यासाठी जात आहे. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, त्यांना सलमान खानचा सिनेमा पाहण्यासाठी कोणत्याही कारणाची आवश्यकता नाही. काही चाहत्यांच्या मते दबंग 3 एकदम बेकार असून त्यात खास असं काहीच नाही. काहीच्या मते मागील 2 दबंग सिनेमांपेक्षा हा सिनेमा चांगला आहे.

https://twitter.com/Khiladi_desi/status/1207305048536961025

दबंग 3 सिनेमाची स्टोरी चुलबुल पांडेच्या भूतकाळाबद्दल आहे. सिनेमात पुन्हा एकदा सलमान चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसत आहे. यावेळी तो पहिल्यापेक्षा जास्त यंग दिसत आहे. सलमान खान सोबत सोनाक्षी सिन्हा रोमांस करताना दिसत आहे. यासोबतच महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरनं या सिनेमातून डेब्यू केला आहे. प्रभू देवाला घेऊनंही लोकांनी पोस्ट शेअर केल्या आहेत.

https://twitter.com/beingAffy01/status/1207651830374813696

https://twitter.com/zmilap/status/1207756680546705409

https://twitter.com/SalmansDamsel/status/1207738236493160448

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/