गणपती विसर्जनादरम्यान तोंडात टोपी पकडून ‘धमाल’ नाचला सलमान खान, शेरानं केली गणेश आरती (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूडचा अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या घरच्या दीड दिवसांच्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात विसर्जन झालं. यावेळी संपूर्ण खान कुटुंब सोबत दिसले. यावेळी विसर्जन मिरवणुकीत सलमान ढोल-ताशांच्या तालावर थिरकताना दिसला. गणपती विसर्जनावेळी स्वरा भास्कर, डेजी शहा, वलूशा डिसूजा सलमानसोबत दिसून आल्या. सलमान खानचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमानची बहीण अर्पिता खान हिच्या घरी बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनी गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. ज्यानंतर संपूर्ण विधीवत पूजेसह दीड दिवसांनी या बाप्पांचा विसर्जन करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढत त्यांना वाजतगाजत निरोप देण्यात आला. यावेळी सलमान वादकांमध्ये जाऊन त्यांचा उत्साह वाढवताना पाहायला मिळाला. सलमान खानचा नृत्य करतानाचा हा व्हिडिओ त्याच्या फॅनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

सलमान खान सध्या आपल्या दबंग 3 चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमध्ये सुरू आहे. गणेशोत्सवासाठी सलमान शूटिंग सोडून मुंबईला परतला. प्रभुदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान अभिनीत हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साऊथ स्टार किच्चा सुदीप खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

 

 

 

You might also like