…म्हणून ‘भाईजान’ सलमान कोणत्याही सिनेमात Kissing सीन देत नाही ! कारण वाचून ‘चकित’ व्हाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या सिनेमांमध्ये त्याचा भर हा अॅक्शन सीनवर जास्त असतो. तुम्ही पाहिले असेल की, बोल्ड सीन किंवा किसिंग सीन सलमानच्या सिनेमांमध्ये दिसत नाहीत. न्यूडिटीपासूनही तो चार हात लांबच दिसतो. याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. अनेकांना यामागील कारण जाणून घ्यायचे होते. एका मुलाखतीत सलमाननं या गोष्टीचा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना सलमान खान म्हणाला, “एकदा मी कुटुंबियांसोबत इंग्रजी सिनेमा पहात होतो. सिनेमात अनेकदा स्मूचिंग सीन येत होते. त्यामुळं घरातले शरमेनं लाजत होते. आईवडिलांसमोर असे सीन पाहताना मलाही लाजल्यासारखं आणि विचित्र वाटत होतं. असं सीन आले की, मी तिथून निघून जायचो. तेव्हाच मी ठरवलं की, माझ्या सिनेमात मी असे सीन करणार नाही. माझा सिनेमा कुटुंबासोबत पाहता यावा. असं कोणी उठून जाऊ नये असं मला वाटत होतं.”

सलमान पुढे बोलताना म्हणाला की, “सिनेमांमध्ये जेव्हा किसिंग सीन येतो, तेव्हा कुटुंबीयांसोबत पाहताना खूपच विचित्र वाटतं. नग्नता आणि किसिंग सीन नसलेल्या सिनेमांवरच मी माझं लक्ष केंद्रीत करू इच्छितो. माझ्या बॅनरअंतर्गत निर्मित होणाऱ्या सिनेमांमध्ये अॅक्शन, रोमान्स, खट्याळपणा असावा असं मला वाटतं. जर माझा सिनेमा ‘A’प्रमाणपत्राचा असेल तर त्यातील अॅक्शन सीनमुळे असावा. सिनेमांमधील किसिंग सीन आणि न्यडिटीपासून मी लांबच राहतो.” असे सलमान म्हणाला.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही.