Lockdown 3.0 : कोरोनाच्या संकटामध्ये गरजुंच्या मदतीसाठी पुन्हा सरसावला ‘भाईजान’ सलमान

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. सलमान खानने तिथे फार्महाउसमधूनच घरातच राहून कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरससंदर्भात लढण्याचे आवाहन त्याने केले आहे. फार्म हाऊसमधून आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान आपल्या कुटुंबियांसोबत एकत्र येऊन एका स्टोअर रूममधून अन्नधान्य आणि खाण्या-पिण्याचे काही अत्यावश्यक सामान जवळच उभ्या असणार्‍या एका बैलगाडीमध्ये ठेवण्यासाठी मदत करत आहे.

सलमान ज्या फार्महाउसमध्ये राहत आहे. तेथील आसपासच्या गावांमध्ये राहणार्‍या गरजू लोकांना रेशन देऊन त्याने मदत केली आहे.त्याच्यासोबत उलिया वंतूर, अभिनेत्री आणि सलमानची खास मैत्रिण जॅकलीन फर्नांडीस या दोघीही दिसून आल्या. व्हिडीओच्या शेवटी आवश्यक सामान घेऊन सर्व बैलगाड्या फार्महाऊसमधून बाहेर जाताना दिसत आहेत.

सलमान खानने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे 23 हजार मजूरांच्या अकाउंट्समध्ये थेट प्रति व्यक्ती 3 हजार रूपये याप्रमाणे एकूण 6.90 कोटी रूपयांची मदत केली होती. एवढचं नाहीतर मजुरांच्या खात्यात पैसे टाकण्याव्यतिरिक्त सलमानने या लॉकडाऊन दरम्यान, इंडस्ट्रीशी निगडीत गरीब मजुर आणि इतर गरजूनां अत्यावश्यक साहित्य पोहोचलविले होते.