‘भाईजान’ सलमानला पाठिंबा देत चाहत्यांनी केलं ‘हे’ अफलातून काम, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझे करिअर संपवले अशी धक्कादायक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. पण सलमानच्या चाहत्यांनी सलमानला पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे.

https://twitter.com/Saiyaara_Soul/status/1274164038306426880

अभिनव कश्यपने काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझे करिअर संपवले अशी धक्कादायक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. त्याची पोस्ट तुफान व्हायरल झाली. त्यानंतर सलमानचे वडिल सलीम खान यांनी अभिनवला जे करायचे आहे ते करु द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर भाऊ अरबाज खानने या विरोधात करवाई केली जाईल असे म्हटले होते. दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई राबिया अमीनने देखील सलमानवर गंभीर आरोप केले. त्यानंतर सोशल मीडियावर सलमानला ट्रोल करण्यात आले होते. पण आता सलमानच्या चाहत्यांनी सलमानला पाठिंबा दिला आहे. ट्विटरवर सलमान खानला पाठिंबा देण्यासाठी जवळपास तीन लाख चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे.