कोरोनामुळे ‘भाईजान’ सलमानचे वडिल सलीम खान नैराश्यात, म्हणाले – ‘आयुष्यच बदलून गेलंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोनाच्या विळख्यातून नामांकित सेलिब्रिटीसुध्दा सूटले नाही. अनेक कलावंतांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या अनेकांना बेड, रेमडेसिविर न मिळाल्याने प्राण जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या भयावह स्थितीमुळे सलमान खानचे वडील सलीम खान नैराश्यात गेले आहेत. बॉस डायलॉग्स या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केल असून कोरोना आयुष्यच बदलून गेल्याचे म्हंटल आहे.

या मुलाखतीत सलीम खान यांनी कोरोना काळात आलेले अनुभव सांगितले. ते म्हणाले, कोरोनामुळे बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे अनेक दिवस बंद घरातच राहवं लागल. त्यामुळे माझा स्वभाव चिडचिडा झाला आहे. मास्क लावूनच घराबाहेर पडाव लागत आहे. नाक्यानाक्यावर पोलीस तैनात. मुक्तपणे फिरुही शकत नाही. अनेक बेराजगार झाले. अनेकांचे संसारही खाली बसले अशी एकूण सर्वत्र निराशाचं वातावरण. याचा नकळतपणे माझ्यावर प्रभाव पडला आणि मला देखील नैराश्यात गेल्यासारख वाटू लागल.

देशात २४ तासांत आढळले १ लाख ५२ हजार ८७९ कोरोनबाधित
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासातील कोरोनाची स्थिती आकडेवारीस्वरुपात जाहीर केली आहे. धक्कादायक म्हणजे या अहवालात रुग्णवाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात १ लाख ५२ हजार ८७९ कोरोनबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ झाली असून २४ तासांत ८३९जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.