‘फॅन’चा फोन सलमान खाननं हिसकला, बंदी घालण्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चाहत्याचा फोन हिसकावून घेण्यास भाग पाडले गेले आहे. नॅशनल स्टूडंट युनियन ऑफ इंडियाला (एनएसयूआय) सलमान खानने चाहत्यासोबत केलेली वागणूक आवडली नाही. आयएएनएसच्या वृत्तानुसार सलमान खानने हा फोन हिसकावण्याच्या घटनेबद्दल जाहीरपणे माफी मागितल्याशिवाय एनएसयूआयने सलमान खानच्या गोव्यातील प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

NSUI चे अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले. त्यांनी लिहिले- ‘माझी विनंती आहे की तुमच्या प्राधिकरणाने कृपया या प्रकरणात गांभीर्याने पहा. हा चाहत्याचा सार्वजनिक अपमान असल्याने अभिनेत्याकडून माफी मागितली पाहिजे. अश्या प्रकारचे खराब रेकॉर्ड असलेल्या हिंसक कलाकारांना गोव्यात येऊ दिले जाऊ नये.

NSUI व्यतिरिक्त माजी खासदार आणि गोव्याचे भाजप सचिव नरेंद्र सवीकेकर यांनी सलमान खानचे वागणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यांनी सलमान खानचा व्हिडिओही ट्विट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करीत त्यांनी लिहिले – सेलिब्रेटी म्हणून लोक आणि चाहते सार्वजनिक ठिकाणी आपल्याबरोबर सेल्फी घेतील. आपली वृत्ती आणि वर्तन अत्यंत खेदजनक आहे. यासाठी तुम्ही माफी मागावी.

राधे चित्रपटची शूटिंग करण्यासाठी सलमान खान गोव्यात गेला आहे. एनएसयूआयच्या मागणी लक्षात घेता सलमान खानला गोव्यात प्रवेश करण्यास बंदी घातल्यास त्यांच्या राधे चित्रपटाचे शूटिंग अडचणीत येईल.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like