अ‍ॅनिमेटेड अवतारात दिसणार ‘चुलबुल पांडे’, लकरच डिजिटलवर रिलीज होणार ‘दबंग’ सीरिज !

पोलीसनामा ऑनलाइन – दबंग फ्रेंचायजीचे 3 सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर आता चुलबुल पांडेचं आणखी एक व्हर्जन पाहायला मिळणार आहे. अशी माहिती आहे की, सलमानची ही सुपरहिट सीरिज आता अ‍ॅनिमेशनमध्ये पहायला मिळणार आहे. दबंगमधील सर्वच कॅरेक्टर तुम्हाला अ‍ॅनिमेटेड रुपात दिसणार आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे.

अशी माहिती आहे की, याचे 2 सीजन असणार आहेत. पहिल्या सीजनमध्ये 52 एपिसोड. प्रत्येक एपिसोड हा अर्ध्या तासाचा असणार आहे. मेकर्स याच्या रिलीजसाठी वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत बातचित करत आहेत.

दबंग सीरिजच्या अ‍ॅनिमेटेड सीरिजच्या बातमीला सिनेमाचा प्रोड्युसर आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खाननं कंफर्म केलं आहे. अरबाजनं सांगितलं की, चुलबुलची लोकांमध्ये खूप क्रेज आहे. याशिवाय त्यानं याआधी असं कोणतं कॅरेक्टर पाहिलंही नाहिये.

अ‍ॅनिमेशन कंपनी कोस्मोस माया या सीरिजला तयार करणार आहे. अरबाज म्हणतो की, आम्हाला आनंद आहे की, आम्ही कॉसमॉस सोबत काम करत आहोत ज्यांनी आतापर्यंत लाखांचं मन जिंकलं आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like