‘महाशिवरात्री’ला ‘भाईजान’ सलामनची गर्लफ्रेन्ड यूलियानं केली महादेवाची ‘पुजा’ (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर कॅमर्‍यासमोर खुप कमी दिसते. परंतु, सलमानसोबत ती कुठल्यातरी निमित्ताने नेहमीच चर्चेत असते. असाच तिचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करताना युलिया या फोटोत दिसत असून सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवलिंगाची पूजा करताना युलियाने सलवार सूट परिधान केल्याचे या फोटोत दिसत आहे. हात जोडून आणि डोळे बंद करून ती पूजा करताना दिसत आहे. तिने हा फोटो शेयर करून लोकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, मी नशीबवान आहे, मला प्रेम आणि ज्ञान मिळाले.

युलिया आणि सलमानचे नाते खुप जवळचे आहे. दोघे नेहमी विविध कार्यक्रमात एकत्र दिसतात. युलियाने सलमान खानच्या रेस 3 मध्ये आपला सिंगिंग डेब्यू केला होता. युलिया राधा क्यों गोरी मैं क्यों काला चित्रपटात डेब्यू करणार होती. परंतु, अजूनही या चित्रपटाबाबत अंतिम निर्णय सुरू आहे. मागच्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनची पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये युलिया वंतूर सुद्धा सहभागी झाली होती.

काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो युलिया आणि मलायका अरोरा तसेच अरबाझ खानचा मुलगा अरहान खान यांच्यासोबत मध्यरात्री सायकल राईड करताना दिसत होता. सलमान खानच्या 54 व्या बर्थडे पार्टीत सुद्धा युलिया उपस्थित होती. या पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये युलिया सलमानला किस करताना दिसत आहे.

You might also like