विवेकने शेअर केलेल्या ऐश्वर्याच्या ‘त्या’ मीमवर सलमान म्हणाला..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल बाबत एक फोटो शेअर केला होता. त्यात त्याने ऐश्वर्या रायच्या फोटोचा वापर करत खिल्ली उडवली होती. या फोटोत ऐश्वर्यासोबतच सलमान आणि अभिषेक बच्चन यांचाही समावेश होता. त्याच्या या फोटोच्या पोस्टनंतर त्याच्यावर राजकीय नेत्यांसह अनेक कलाकारांनीही टीका केली. याशिवाय राज्य तसेच केंद्रीय महिला आयोगानेही विवेकला नोटीस पाठवत स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर आता या सगळ्याबाबत सलमानने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी बोलताना सलमानने ट्विटर जास्त अ‍ॅक्टीव्ह नसल्याचे सांगितले. सलमान म्हणाला की, “मी लक्षच देत नाही. पूर्वीसारखं मी आता ट्विटरवर अ‍ॅक्टीव्ह नसतो त्यामुळे आता मीम्स कुठे बघत बसू. मला माझे काम महत्त्वाचे आहे. मी काम करू की कमेंट्स पाहू. मी अजिबातच अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही.” असे उत्तर सलमान खानने दिले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
दरम्यान, विवेक ओबेरॉयने त्याचे हे एक्झिट पोलचे ट्विट डिलिट केले असून त्याने माफीही मागितली आहे. यासंदर्भात विवेकने ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये विवेक म्हणाला की, “जर एखाद्या महिलेला माझ्या ट्विटमुळे वाईट वाटले असेल किंवा भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी माफी मागतो आणि ते ट्विटही डिलीट करतो.” विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल (Exit Poll) आणि ऐश्वर्या रॉयचा (Aishwarya Rai) फोटो एकत्र करत एक ट्विट केलं होतं. हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं होतं.

जे मीम विवेकने शेअर केलं होतं, ते तीन भागात होतं. त्यात ओपिनेयन पोल एक्झिट पोल आणि रिजल्ट असा समावेश होता. त्यात ओपिनियन पोलमध्ये ऐश्वर्या सलमान सोबत दिसत आहे, एक्झिट पोलमध्ये विवेक ओबेरॉय सोबत दिसत आहे तर रिजल्टमध्ये अभिषेक बच्चन, आराध्या यांच्यासोबत दिसत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like