Salman Khan House Firing Case | फायरिंग झाली तेव्हा काय करत होता सलमान खान? 4 तासात नोंदवला जबाब, अरबाज खानला पोलिसांनी विचारले 150 प्रश्न

नवी दिल्ली : Salman Khan House Firing Case | मुंबई क्राईम ब्रांचने (Mumbai Crime Branch) अभिनेता सलमान खानचे बांद्रा येथील निवासस्थान गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartments Firing Case) बाहेर १४ एप्रिल रोजी झालेल्या फायरिंग प्रकरणी सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा जबाब नोंदवला. ४ जूनला क्राईम ब्रांच सलमानचा जाबाब घेण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. फायरिंगच्या वेळी सलमान घरातच होता. मुंबई क्राईम ब्रांचच्या एका अधिकाèयाने सांगितले की, घटनेच्या दिड महिन्यानंतर सलमान खान आणि अरबाज खानचे (Arbaaz Khan) जबाब नोंदवण्यात आले.(Salman Khan House Firing Case)

४ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास क्राईम ब्रांचचे चार अधिकारी सलमानचा जबाब घेण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. सलमान खानचा जबाब नोंदवण्यास सुमारे चार तास लागले, तर अरबाज खानचा जबाब नोंदवण्यास दोन तास लागले. क्राईम ब्रांचचे पथक सायंकाळी ५.३० वाजता सलमानच्या घरातून बाहेर पडले.

गोळ्यांच्या आवाजाने जागे झालो
अरबाज खानचा ४ पानी जबाब नोंदवण्यात आला असून सलमान खानचा जबाब नऊ पानांमध्ये नोंदवण्यात आला आहे.
सलमानने पोलिसांना जो जबाब दिला आहे, त्यानुसार घटना घडली त्या रात्री त्यांच्या घरी पार्टी होती.
ज्यामुळे ते सर्वजण उशीरा झोपले आणि सकाळी गोळ्यांचा आवाज ऐकून ते जागे झाले.
सलमानने म्हटले की, घटना खुपच गंभीर होती. मात्र, सलमानने मुंबई पोलिसांचे त्यांच्या चांगल्या कामासाठी कौतुक केले.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या पथकाने सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खानला सुमारे १५० प्रश्न विचारले.

सलमानचे वडीलांचे वय जास्त झाले असल्याने त्यांचा जबाब नोंदवण्यात आला नाही, गरज भासल्यास तो नोंदवण्यात येईल
असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच मुख्य आरोपी लॉरेंस बिश्नोईला साबरमती जेलमधून ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar-EVM Machine Pooja | रुपाली चाकणकरांची ईव्हीएम पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Ranjangaon Ganpati Pune Crime News | ‘ज्वेलर्स’च्या दुकानाचे शटर उचकटून 16 लाख 25 हजारांचे दागिने चोरीला; रांजणगाव गणपती येथील घटना

Anil Deshmukh On Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मृत तरुण-तरुणी दारु पिऊन गाडी चालवत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न’ माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

Bibvewadi Gangadham Chowk Pune News | गंगाधाम चौक परिसरातील रस्ते भविष्यात होणार मृत्यूचे जाळे? वाढत्या जड वाहतुकीमुळे तीव्र उतारावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेउन प्रवास (Videos)