भन्साळी पुन्हा सल्लूसोबत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दंबग सलमान खान आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. भन्साळी प्रोडक्शन्सचे सीईओ प्रेम सिंह यांनी ही माहिती एका पोर्टलला दिली. “हम दिल दे चुके सनम” या चित्रपटानंतर सलमान खान व संजय भन्साळी हे बऱ्याच दिवसांनी एकत्र येत आहेत.

संजय लीला भन्साळी यांनी “हम दिल दे चुके सनम” हा चित्रपट १९ वर्षांपुर्वी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन हे अभिनयच्या मुख्य भूमिकेत होते.सूत्रांनी दिलेल्या महिती नुसार दिग्दर्शक भन्साळी आणि बॉलिवूड स्ट्रार सलमान खान एखादा चांगला चित्रपट करण्याच्या विचारात होते.

पदमावत या चित्रपटानंतर भन्सळी यांच्या हातात तीन स्क्रिप आलेले असून त्या करिता चित्रपटातील भूमिकेसाठी अनेक कलाकारांचा शोध सुरु झाला आहे.परंतु दिग्दर्शक भन्साळी यांच्या या चित्रपटात सलमान खान मुख्य भुमिकेत असणार आहे असे म्हटले जात आहे. याआधी अभिनेता सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्या सोबत अनेक चित्रपटांत काम केलं आहे