सलमान खान काढणार स्वतःचा टीव्ही चॅनेल

मुंबई : वृत्तसंस्था – छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ची निर्मिती केल्यानंतर आता बॉलिवूडचा बजरंगी भाईजान स्वतःचा टीव्ही चॅनेल काढण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आले आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने ‘सलमान खान फिल्म’व्दारे अनेक नवनवीन चेहरे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये लाँच केले आहेत. इतकेच नव्हे तर, सलमान खानने मोठा पडदाच नव्हे तर छोट्या पडद्यावरही काम केले आहे. विशेष म्हणजे, सलमान खानने ‘बिग बॉस’सारखा रिऍलिटी शो होस्ट केला आहे. तसेच ‘द कपिल शर्मा शो’ची निर्मिती केली आहे. आता याचदरम्यान सलमान एक नवा चॅनेलच घेऊन येत आहे. त्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’ नव्या चॅनेलवर शिफ्ट होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, सलमान खानला अद्यापही टीव्ही चॅनेलचे लायसन्स मिळाले नाही असे समजत आहे. या टीव्ही चॅनेल शिवाय ‘बीइंग चिल्ड्रेन’ नावाचे एक फाऊंडेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या फाऊंडेशनमध्ये मुलांचे शिक्षण आणि त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. असे सांगण्यात येत आहे.

Loading...
You might also like