‘अनलॉक’ झाल्यानंतर ‘भाईजान’ सलमान आणि जॅकलीननं सर्वात आधी केलं ‘हे’ काम ! व्हिडीओ झाला व्हायरल (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अलीकडेच देशात लॉकडाऊन 5.0 ला सुरुवात झाली. परंतु या काळात हळूहळू सर्व काही अनलॉक होताना दिसत आहे. अशात लॉकडाऊनमध्ये कुटुंबासोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकलेल्या अभिनेता सलमान खाननं त्याच्या आवडीचं एक काम केलं आहे. याचा व्हिडीओ देखील सध्या सोशलवर व्हायरल होतना दिसत आहे.

लॉकडाऊन अनलॉक होताना काही नियमांमध्ये सूट मिळाली आहे. या काळात सलमान खाननं सर्वात आधी सायकलिंगचा आनंद घेतला आहे. मुंबईच्या मोकळ्या रस्त्यावर सलमान सायकल चालवतान दिसला. खास बात अशी यावेळी त्याच्यासोबत जॅकलीन देखील होती. सलमान पुढे गेला आणि नंतर त्याच्या मागे जॅकलीन आणि काही लोक जाताना दिसले. काही रस्त्यावरील लोकही त्याला चिअर करताना दिसले. सध्या काही व्हिडीओ समोर आले आहेत जे सोशलवर चर्चेत आहेत.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like