#Video : सलमानच्या ‘भारत’चा दमदार ट्रेलर Trailer प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खानचा आगामी सिनेमा भारतचा नकुताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या हा ट्रेलरचा चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यातील अनेक दमदार डायलॉग प्रेक्षकांना विशेष आवडताना दिसत आहे. भारतचा ट्रेलर प्रेक्षकांना भावल्याचे दिसत आहे. आजच(सोमवार दि 22 एप्रिल) रोजी हा ट्रोलर रिलीज झाला आहे. प्रदर्शित होताच काही वेळातच या ट्रेलरला जवळपास 5 लाख लोकांनी पाहिले आहे.

भारत या सिनेमातील अनेक पोस्टर याआधी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यात सलमान आणि कतरीना कैफचा लुक समोर आला होता. त्यानंतर आता ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 3 मिनीट 11 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सिनेमातील एकूण कथेचा अंदाज येतो. या ट्रेलरमधील अनेक डायलॉग लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. ‘देश लोगों से बनता है और पहचान उनके परिवार से होती है, और तुझ में तो पूरा देश है भारत’ हा एक डायलॉग ट्रेलरच्या शेवटी ऐकायला मिळतो. हा डायलॉग लक्षवेधक आहे. या सिनेमात सलमान खानच्या तारुण्यापासून ते वृद्धापकाळाचा सर्व प्रवास दिसत आहे. त्यामुळे जवळपास पाच वेगळ्या रोलमध्ये सलमान पहिल्यांदाच झळकणार आहे. ट्रेलर खूपच उत्सुकता वाढवणारा आहे.

भारत या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कतरीना वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. सलमान तर तिला एका विशेष नावाने संबोधताना दिसतो. ‘मॅडम सर’ असं सलमान कतरीना संबोधत असल्याचं दिसतं. या सिनेमात सलमानशिवाय, जॅकी श्रॉफ, कतरीना कैफ, सुनील ग्रोवर, दिशा पटानी, नोरा फतेही हे कलाकारही दिसत आहेत. सिनेमात जॅकी श्रॉफ यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारल्याचे दिसत आहे. दमदार अॅक्शन सीनही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.

भारत हा सिनेमा या ईदला म्हणजेच 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. “Ode To My Father’ या दक्षिण कोरियन सिनेमावर आधारीत भारत हा सिनेमा आहे. हा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रशियन सर्कस सोबतच अनेक इतर साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत असा अंदाज ट्रेलरमध्ये येतो.