‘भाईजान’ सलमाननं लाँच केला पर्सनल केअर ब्रँड FRSH, सॅनिटायजर्सनं केली सुरुवात ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सलमान खाननं त्याच्या नवीन व्यावसायिक उपक्रमात FRSH ब्रँड अंतर्गत सॅनिटायजर्स लाँच केले आहेत. 24 मे रोजी मध्यरात्री सलमाननं ब्युटी आणि पर्सनल केअर ब्रँड FRSH घोषणा केली. एक व्हिडीओ शेअर करत सलमान म्हणाली की, सुरूवातीला आम्ही डिओडोरंट लाँच करण्याचा प्लॅन करत होतो. परंतु सध्याची गरज पाहता आम्ही सॅनिटायजर लाँच करत आहोत.

salman-brand
File Photo

सलमान म्हणाला, “सॅनिटायजरनंतर डिओडोरंट, बॉडी वाईप्स, परफ्युम्स असे इतरही प्रॉडक्ट लाँच केले जाणार आहेत. सध्या FRSH सॅनिटायजर्स (जे 72 टक्के अल्कोहोलवर आधारीत आहेत) याच ब्रँडच्या अधिकृत वेबासईटवर उपलब्ध आहेत. नंतर हे दुकानातही उपलब्ध असतील.”

FRSHच्या वेबसाईटनुसार, सॅनिटायजरची 100 मिलीच्या बाटलीची किंमत 50 रुपये आणि 500 मिलीच्या बाटलीची किंमत 250 रुपये आहे. वेबसाईटनुसार, कॉम्बो सेटच्या खरेदीवर 10 ते 20 टक्के सूटही आहे. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like