‘दबंग 3’च्या सेटवरून लिक झाला भाईजान सलमानचा LOOK, ‘व्हायरल’ झाले चुलबुल पांडेचे PHOTOS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलमान खान या दिवसात सतत चर्चेत आहे. कधी बंद केलेला चित्रपट ‘इंशाहल्ला’मुळ तर कधी नवीन चित्रपटाच्या किक 2 च्या घोषणेमुळे. यासोबतच सलमान आपल्या नव्या फिल्म दबंग 3 च्या शुटिंगमध्येही जोरदार मेहनत करत आहे. तसे, सलमानची स्टाईल अनेकदा चाहत्यांना आवडते पण जर खूपच वाट पाहत असलेल्या चित्रपटाचा जर लूक समोर आला तर सलमान फॅन त्याला जोरदार पद्धतीने व्हायरल करतात. ‘चुलबुल पांडे’चा सलमानचा लूक फिल्म दबंग 3 च्या सेटमधून समोर आला आहे. सोशल मीडियावर सलमान फॅन कडून या नव्या लुकच जोरदार स्वागत होत आहे.

सलमान सध्या राजस्थानमध्ये आपल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अशा परिस्थितीत त्याची नायिका सोनाक्षी सिन्हा आणि फॅशन डिझायनर आश्‍ले रेबेलोने हा स्टायलिश लुक लोकांसमोर आणला आहे. ‘दबंग 3’ च्या सेटमधून दिसलेल्या सलमानच्या या लूकमध्ये तो शर्ट आणि जीन्सच्या लुकमध्ये काळ्या रंगाचा चष्मा घालून बसच्या वर बसलेला दिसत आहे. ढोलकी, हार्मोनियमसुद्धा त्यांच्या आजूबाजूला दिसतात. सलमानचा हा फोटो स्वत: सोनाक्षी सिन्हाने क्लीक केला आहे.

दबंग 3 चे दिग्दर्शन प्रभुदेवा करीत असून सलमान खान आणि अरबाज खानची प्रॉडक्शन हाऊस निर्मित आहेत. हा चित्रपट २०१२ च्या दबंगचा सिक्वेल आहे. हा चित्रपट हिंदीव्यतिरिक्त तेलगू, तामिळ आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार असल्याची घोषणा सलमानने केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –