#Loksabha election बॉलिवूडचा भाईजान भाजपच्या ‘या’ दिग्गज महिलेला देणार आव्हान ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आता बॉलिवूडचा भाईजानही लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या विरोधात इंदूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे म्हंटले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्व सलमान खान च पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे सध्या सर्व पक्षांची लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. याचदरम्यान, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर अभिनेते अरुण गोविल निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने अद्यापही आपला उमेदवार निश्चित केलेला नाही.

मध्य प्रदेश कल्याणमल नर्सिंग होममध्ये सलमान खानचा जन्म झाला आहे. आणि संपूर्ण देशात सलमान खानची लोकप्रियता आहे. त्यामुळे जन्म भूमीमुळे आणि लोकप्रियतेमुळे जनमत मिळेल असा काँग्रेसचा अंदाज आहे. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचे नाव सुचवले होते . तसेच त्याला मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्त केली होती.

विशेष म्हणजे, लोकसभा सदस्या सुमित्रा महाजन या सलग आठव्यांदा इंदूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. आणि त्यांचे कार्य पाहता सुमित्रा महाजन यांचा पराभव करून सत्ता मिळवणे काँग्रेसकला अवघड जाणार आहे. आणि भाजपची ही जागा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस प्राण पणाला लावणार असल्याचे दिसून येत आहे.

इंदूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने अद्यापही आपला उमेदवार निश्चित केलेला नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना कोण टक्कर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

 

आमदार अनिल भोसले पुन्हा सक्रिय होणार ?

२२ वर्षीय युवतीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली तर सर्वप्रथम शेतकरी कर्ज माफी : सुप्रिया सुळे

‘ते’ दहशतवाद्यांसारखे दिसतात