Salman Khan | अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षितेत वाढ

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सलमान खानच्या टीम मधील एका तरुणाला रोहित गर्ग या नावाने धमकीचा ईमेल आल्याने आता मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षितेत वाढ केली आहे. या ईमेलमध्ये सलमानला (Salman Khan) धमकी मिळाली असून तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा देखील यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

सलमान खानच्या टीम मेंबरला हा मेल प्राप्त होताच मुंबईतील वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात कलम 506 (2), 120 (ब) आणि 34 या अन्वये गुन्हा दाखल केले आहे. तर आता सलमान खानच्या घराभोवती सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. एवढेच नाही तर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police ) सलमान खानला आता Y+ सुरक्षा प्रदान केली आहे. या आधी देखील सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने असेच महत्त्वाचे पाऊल उचलले होते. आता पोलिसांनी या प्रकरणी दखल घेऊन गुन्हा दाखल करत सलमान खानच्या घराभोवती कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

सलमान खानचा (Salman Khan) सहकारी प्रशांत गुंजाळकर याला हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. या ईमेलमध्ये असे नमूद करण्यात आले होते की, “”गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से. इंटरव्ह्यू (लॉरेन्स बिश्नोई) देख लिया होगा उसने. अगर नही देखा तो बोल देना देख लेना. मॅटर क्लोज करना है तो बात करवा दियो. फेस टू फेस करना है तो बता दियो. अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दियो, अगली बार बडा झटका देंगे”. हा ई-मेल rohitgarg<[email protected]> या ईमेल आयडी वरून पाठवण्यात आला होता.

ई-मेल मिळाल्यानंतर सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी भाई आणि
लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आता सलमान खानला अशा पद्धतीने ईमेल प्राप्त झाल्यानंतर कला विश्वात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title :  Salman Khan | mumbai police beefs up security outside actor salman khans residence after threat email

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीस लाच प्रकरण! बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

Pune Pimpri Chinchwad Crime | जोडप्याचे रिक्षात अश्लिल चाळे, हटकल्याच्या रागातून रिक्षा चालकाचा खून; दापोडी मधील घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime News | शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान राडा; लॉज मालकाला बेदम मारहाण

Nashik Crime News | नाशिकमध्ये तोल जाऊन गिर्यारोहकाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू