Salman Khan Net worth | 2300 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘दबंग’ सलमान खान, लग्न झाले नाही तर हा असेल ‘भाईजान’चा वारस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Salman Khan Net worth | दबंग सलमान खान (Salman Khan) चे चाहते त्याच्या लग्नाची वर्षानुवर्षे आतुरतेने वाट पाहत आहेत, पण सलमान असा आहे की तो बाशिंग बांधायला तयार नाही. सलमानच्या लग्नाच्या बातम्या आत्तापर्यंत अनेकदा मीडियात आल्या असल्या तरी त्याची वधू पाहण्याची इच्छा मात्र अधुरीच राहिली. (Salman Khan Net worth)

 

सलमान खानचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Salman Khan Movie On Box Office) विशेष कामगिरी दाखवू शकले नसले, तरी त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. सलमान आता 56 वर्षांचा झाला असून दबंग खान लग्न करेल या आशेवर लोक अजूनही आहेत. मात्र सलमान लग्नाच्या मूडमध्ये नाही.

 

किती आहे सलमान खानची एकूण संपत्ती ?
सलमान खान दरवर्षी चित्रपट आणि जाहिरातींमधून भरपूर कमाई करतो. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान एकूण 2300 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. सलमान हा बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा स्टार आहे, ज्याच्याकडे अनेक आलिशान वाहने आणि करोडोंची मालमत्ता आहे. गेल्या 34 वर्षांपासून सलमान बॉलिवूडमध्ये सतत काम करत आहे. त्याने ’हम आपके है कौन’, ’मैने प्यार किया’, ’दबंग’ आणि ’वॉन्टेड’ सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (Salman Khan Net worth)

सलमानच्या संपत्तीचा कोण असेल वारस ?
सलमान खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याच्यानंतर त्याच्या संपत्तीचा वारस कोण असेल. सलमानने मुलाखतीत सांगितले होते की, ’मी लग्न करेन किंवा नाही, पण माझ्यानंतर माझी अर्धी संपत्ती ट्रस्टमध्ये दिली जाईल. मी लग्न केले नाही तर माझी सर्व मालमत्ता ट्रस्टला दान केली जाईल.

 

या चित्रपटात दिसणार सलमान
सलमान खान शेवटचा ’अंतीम द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसला होता.
आता चाहत्यांना त्याच्या पुढील चित्रपटांची प्रतीक्षा आहे.
सलमान लवकरच कतरिना कैफ (Katrina Kaif) सोबत त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ’टायगर 3’ मध्ये दिसणार आहे.
हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 21 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
सलमान आणि कतरिनाची जोडी पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Salman Khan Net worth | salman khan net worth dabang khan is the owner of property worth 2300 crores salman khan told who will be his

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा