बॉलिवूड मध्ये सलमान खान सोबत ……हिचे पर्दापण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने अनेक नवोदित चेहऱ्याला एक वेगळे स्थान निर्माण करुन दिले आहे. अनेक नवी अभिनेत्री सलमान सोबत काम करुन प्रसिद्ध झाली आहे. अशा अनेक नव्या अभिनेत्रीला त्याने संधी दिली आहे. आता तो त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला लवकरच बॉलिवूड मध्ये लॉन्च करणार आहे. नक्की त्याच्या कुटुंबातील सदस्य कोण आहे. जिच्या बॉलिवुड पर्दापणासाठी सलमान दर्जदार व रोमँन्टिक कथा लिहणार आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊ

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार सलमान पुढच्या वर्षी त्याची भाची अलिजे अग्निहोत्री हिला लॉन्च करणार असल्याची चर्चा आहे. अलिजे ही ‘दबंग ३’ चित्रपटातून पर्दापण केले असल्याचे समोर आले होते. परंतू, अलिजेची आई आणि वडील यांनी सांगितल्यावर ही चर्चा तिथेच थांबली.

सध्या त्याच्या दमदाम स्क्रिप्टसाठी अलिजे प्रसिद्ध कोरोओग्राफर सरोज खानकडून नृत्याचे धडे घेत आहे. काही दिवसांपुर्वी एका कपड्यांच्या ब्रँडसाठी अलिजेने फोटोशुट केले होते. तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. पुढच्या वर्षी सलमानचे प्रोडक्शन हाऊस अलिजेला लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. या चर्चेनंतर आता सलमानची भाची बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्याच्या ऑफिशअल अनाउन्समेंटची चाहते वाट पाहत आहे.

Loading...
You might also like