आपला ‘टायगर’ वाजिद खानच्या निधनानंतर दु:खी झाला ‘भाईजान’ सलमान, शेअर केलं ‘इमोशनल’ ट्विट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध सिंगर आणि कंपोजर वाजिद खानचं निधन झालं आहे. वाजिद खान किडनीच्या आजारानं ग्रस्त होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. रविवारी (दि 31 मे) त्याची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्याला चेंबूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी (दि 1 जून) त्याच्या निधनाची बामती समोर आली. त्याच्यानंतर अजून लोक सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना दिसत आहे. वाजिदचा मित्र सलमान खाननंही ट्विट करत त्याची आठवण काढली आहे.

तुझ्या आत्म्याला शांती मिलो जावेद
सलमान खाननं ट्विट करत लिहिलं की, “वाजिदसाठी प्रेम आणि सन्मान. वाजिद तुझ्या टॅलेंटसाठी तुला कायम मिस करेन. खूप सारं प्रेम. तुझ्या सुंदर आत्म्याला शांती मिळो.”

साजिद-वाजिदची प्रसिद्ध जोडी आता फुटली
42 वर्षीय वाजिदच्या निधनानंतर देश पुन्हा एकदा स्तब्ध झाला आहे. साजिद-वाजिदची प्रसिद्ध जोडी आता फुटली आहे. साजिद-वाजिद या जोडीचं सलमान खान सोबत खास कनेक्शन होतं.

या सिनेमातून टाकलं बॉलिवूडमध्ये पाऊल
1998 मध्ये आलेल्या प्यार किया तो डरना क्या या सिनेमातून साजिद-वाजिद यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. सलमान सोबत करिअरची सुरुवात करणाऱ्या या जोडीनं बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत.

सलमानसाठी देखील अनेक गाणी कंपोज केली
याचदरम्यान त्यांनी सलमानसाठी देखील अनेक गाणी कंपोज केली. गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग अशा अनेक सिनेमात यांचं योगदान होतं. जवळपास प्रत्येक गाण्यात वाजिदचा आवाज आहे. वाजिदनं सलमान खानचं फेमस गामं जलवा, फेविकॉल से आणि अक्षय कुमारच्या चिंता ता चिता चिता या गाण्याला आवाज दिला होता. बिग बॉस 4 आणि बिग बॉस 6 चा टायटल ट्रॅकही त्यानंच तयार केला होता.

वाजिदनं दोस्तीची मिसाल दिली
वाजिदनं पार्टनर, एक था टायगर, वांटेड असा अनेक सिनेमात आपला आवाज देऊन हे दाखवून दिलं होतं की, त्याच्या मनात सलमान खान प्रति किती प्रेम आहे. जाता जाता देखील वाजिदनं सलमानच्या प्यार करोना आणि भाई भाई ही गाणी कंपोज करत आपल्या दोस्तीची मिसाल दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like