नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवूड चा ‘ भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा आघाडीचा अभिनेता भारत च्या यशानंतर आता आपला पुढचा चित्रपट ‘इंशाअल्लाह’ च्या तयारीस लागला आहे. यामध्ये तो आलिया भट्ट सोबत लीड रोल मध्ये असणार आहे. सध्या मात्र तो आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहे. नुकताच त्याने आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक विडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपल्या पुतण्यांबरोबर मजा मस्ती करताना दिसत आहे.
Nirvaan vs Arhaan … pic.twitter.com/GZMFnY129w
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 22, 2019
आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तो अरबाज खानचा मुलगा अरहान खान आणि सोहेल खान चा मुलगा निरवान खान यांच्याबरोबर दिसत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान आपल्या दोन्ही पुतण्यांबरोबर ‘हॅन्ड स्लीप गेम’ खेळत आहेत. ज्यामध्ये तो स्वतः रेफरी आहे. हा व्हिडिओ पाहून हि गोष्ट मात्र लक्षात येते कि सलमान खान चित्रपटांशिवाय आपल्या परिवारासहित देखील खूप चांगला वेळ व्यतित करत असतो. एकीकडे सलमान खान चे कुटुंबीय टीव्हीवर खेळांचे सामने पाहण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे सलमान मात्र आपला वेळ पुतण्यांबरोर मजा मस्ती करत घालवत आहे.
Arhaan vs me .. pic.twitter.com/7680mRRi7h
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 22, 2019
दुसऱ्या व्हिडिओमध्ये सलमान खान स्वतः अरहान खान बरोबर ‘हॅन्ड स्लीप गेम’ खेळत आहे. या खेळात जिंकल्यानंतर सलमान अरहान खान ला गळाभेट देत आहे. यानंतर तो आपला भाचा अयान अग्निहोत्री सोबतही दिसत आहे. सलमानचे संपूर्ण कुटुंब या खेळात सहभागी होऊन खूप मजा करत आहे.
सलमान खान च्या ‘भारत’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आहे. याचबरोबर वर्षातील सर्वाधिक कामे करणाऱ्या चित्रपटांमध्ये हिचे नाव घेतले जात आहे. या चित्रपटात सलमान बरोबर कतरीना कैफ, दिशा पटानी, सुनील ग्रोवर, तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता त्याची ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाची तयारी सुरु आहे. पुढील वर्षी ईद च्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
दातांवरून जाणून घेता येऊ शकतो, तुमचे आरोग्य किती चांगले
आता दम्याची चाचणीही करता येते ‘ऑनलाइन’, अशी आहे पद्धत
गोड पदार्थांसोबत ‘हे’ पदार्थ खावेत, वाढणार नाही शुगर
आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’