‘भाईजान’ सलमाननं बहिण अर्पिताच्या मुलावर केलं भरभरून ‘प्रेम’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ओनलाईन – भाईजान सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खानने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एक गोंडस मुलीला जन्म दिला. सलमाननेही आपल्या भाची आयतसोबचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांनतर आता नुकताच सलमान आणि आयतसोबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात सलमान आयतनवर भरभरून प्रेम करताना दिसत आहे. या प्रेमळ व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्सना मामा- भाचीचं हे प्रेम आवडत आहे.

सलमानने शनिवारी भाची आयतसोबतचा एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. ज्यात सलमान आयतला किस करताना दिसत आहे. त्यात किस केल्यानंतर आयतची रिॲक्शनही मनाला भावणारी आहे. सलमान सोबतच अर्पितानेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांना अपत्य आहेत. आहिल शर्मा हा मोठा मुलगा असून आता आयत हे दुसरं आपत्य आहे. यांचा मामा अर्थात सलमान अनेकदा त्याच्या भाच्यासोबतचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

दरम्यान, सलमानच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास लवकरच तो ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात दिसणार आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या सिनेमात दिशा पाटणी त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. येणाऱ्या ईदला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमानंतर तो ‘कभी ईद कभी दिवाली’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like