‘कोरोना’ची दहशत वाढत असतानाही ‘भाईजान’ सलमानच्या सिनेमाची शुटींग सुरूच, अशी आहे सेटवरील स्थिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्य भीतीनं बॉलिवूडमधील अनेक सिनेमांनी रिलीज डेट्स बदलल्या आहेत. काही स्टार्सनीही आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. काहींनी शुटींगही पोस्टपॉन केली आहे. परंतु बॉलिवूड स्टार सलमान खान मात्र आपल्या सिनेमातची शुटींग पोस्टपॉन करण्याच्या मुडमध्ये नाही असं दिसतंय. सलमानला आपला आगामी सिनेमा राधे वेळेवर रिलीज करायचा आहे. कोरोनाची लागण वाढत असतानाही त्याच्या सिनेमाची शटींग सुरू राहणार आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, राधे सिनेमाची शुटींग थांबवली जाणार नाही. सिनेमाची क्रू टीम शुटींग सुरूच ठेवणार आहे. कोरोनाची दहशत वाढत असताना हा निर्णय नक्कीच हैराण करणार आहे. असं सांगितलं जात आहे की सिनेमाच्या सेटवर खबरदारी घेतली जात आहे. सिनेमाची टीम सेटवर जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेली गाईडलाईन फॉलो करत आहे. शुटींग सुरू आहे परंतु कोणतीही रिस्क घेणं टाळलं जात आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये बिजी आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.