SAD NEWS : ‘रेडी’मधील छोटया ‘अमर चौधरी’चं निधन, 27 वर्षांच्या वयात कॅन्सरनं हरवलं अन् जगाला केलं ‘अलविदा’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा यंग कॉमेडी अ‍ॅक्टर मोहित बघेलनं जगाचा निरोप घेतला आहे. मोहित 27 वर्षांचा होता जेव्हा त्याला कॅन्सर झाला होता. त्यानं होमटाऊन मथुरेत शेवटचा श्वास घेतला. गेल्या रात्रीच त्याची तब्येत खराब झाली होती. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. यानंतर त्यानं जागाला अलविदा केलं.

सलमान खान सोबत केलं होतं काम

मोहित बघेलनं सलमान खानच्या रेडी सिनेमात अमर चौधरीची भूमिका केली होती. यानंतर त्यानं सलमान सोबत जय हो या सिनेामतही काम केलं होतं. मिलन टाल्कीज, जबरिया जोडी, ड्रीम गर्ल असे त्याचे काही इतर सिनेमे सांगता येतील. काही दिवसांपूर्वीच त्यानं सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या बंटी और बबली सिनेमाची शुटींग पूर्ण केली होती.

मैत्रिणीनं सांगितलं कसा होता मोहित ?

मोहितची मैत्रीण आणि अ‍ॅक्ट्रेस विविधा कीर्तीनं मोहितच्या निधनाची बातमीची पुष्टी केली आहे. विविधानं सांगितलं की, मोहित दीर्घकाळपासून कॅन्सरनं ग्रस्त होता. आता तो या जगात नाही. आयुष्य एन्जॉय करणाऱ्यांपैकी तो एक होता. इंडस्ट्रीतील तो माझा चांगला मित्र होता. मी आतून तुटले आहे.”

मोहितनं 12 वर्षांपूर्वी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून इंडस्ट्रीत काम सुरू केलं होतं. सर्वात आधी तो कलर्सवरील शो छोटे मियामध्ये दिसला होता. याशिवाय त्यानं सोनी टीव्हीच्या पेशवा बाजीरावमध्येही काम केलं आहे.

You might also like