सलमान खानची हत्या करण्यासाठी रेकी करणार्‍याला अटक, मर्डरचे अनेक आहेत आरोप

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मुंबईत फिल्मस्टार सलमान खानच्या हत्येसाठी रेकी करणार्या बदमाशाला गुन्हे शाखेने(क्राइम ब्रांच) अटक केली आहे. गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई यांने ही रेकी करवून आणली आहे. भिवानी येथे राहणारा राहुल लॉरेन्स हा बिश्नोई टोळीचा गुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, राहुलने चार खून केल्याच्या घटना घडल्या होत्या. ऑगस्ट 2019 मध्ये त्याने झज्जरमध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या आदेशानुसार राहुल याने डिसेंबर 2019 मध्ये पंजाबच्या मनोट येथे हत्येची घटना घडवून आणली होती. त्याचप्रमाणे 20 जून 2020 रोजी त्याने भिवानी येथे खुनाची घटना घडवून आणली.

24 जून 2020 रोजी राहुलने फरीदाबाद मधील एसजीएम नगर येथे हत्या करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले आहे. राहुल एनसीआर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करतो. आता गुन्हे शाखेने त्याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. पोलिस चौकशीत आरोपीने अनेक घटनांमध्ये आपला सहभाग असल्याचे उघड केले आहे.

रेकीचे हे प्रकरण अशा वेळी चर्चेत आले आहे जेव्हा सलमान खान पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपट ‘किक 2’ आणि ‘बिग बॉस’ 14 घेऊन येत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शोमध्ये सहभागी होणार्‍यांची कोरोना चाचणी आणि सहभागी होणार्‍या इतर सावधगिरीविषयी चर्चा सुरु आहे. यावेळी शोची रचना कशी असेल यावर चर्चा सुरु आहे.