प्रतीक्षा संपली ! पुढील वर्षी येणार ‘टाइगर’, चाहत्यांना ईदी देणार Salman Khan, शेयर केली गुड न्यूज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Salman Khan | 15 ऑगस्टच्या विशेष निमित्ताने बॉलिवूडचा दबंग सलमान खानने (Salman Khan) एक मोठी घोषणा केली आहे. सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 च्या (Tiger 3) रिलीजची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होते, आता ती प्रतीक्षा संपली आहे. सलमान खानचा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट टायगर 3 ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

 

पुढच्या वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 21 एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये टायगर 3 पाहायला मिळेल. हा चित्रपट केवळ हिंदीतच नाही तर तमिळ आणि तेलगूमध्येही प्रदर्शित होणार आहे. स्पाय एजंट सलमान खानचा स्वॅग पडद्यावर दिसणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायगर फ्रँचायझीला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. टायगर चित्रपटाची गणना सलमान खानच्या सुपरहिट फ्रेंचाइजीमध्ये केली जाते, त्याचे दोन्ही भाग हिट झाले आहेत. (Salman Khan)

 

टायगर 2012 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये त्याचा भाग 2 आला. आता पुढच्या वर्षी 2023 मध्ये टायगर धमाकेदार पुनरागमन करणार आहे. टायगर 3 चे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले आहे आणि आदित्य चोप्रा निर्मिता आहेत. यावेळीही सलमान खान – कतरिना कैफची जोडी जमली आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीही दिसणार आहे. टायगर 3 मध्ये प्रेक्षकांना अ‍ॅक्शन आणि मनोरंजन मिळणार आहे.

 

कोरोनामुळे टायगर 3 च्या रिलीजला विलंब झाला आहे. लॉकडाऊन लागू असताना चित्रपटाचे काही शेड्यूलचे शूट व्हायचे होते.
दरवर्षी ईदला सलमानचे चित्रपट प्रदर्शित होतात.
पण 2022 मध्ये दबंग खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही, या गोष्टीने चाहत्यांची खूप निराशा केली. पुढच्या वर्षी सलमान खानचा चित्रपट ईदच्या दिवशी चाहत्यांना खुश करणार आहे.

 

 

Web Title : –  Salman Khan | salman khan announced tiger 3 release date august 15 independence day katrina kaif

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा