Salman Khan | सलमान खान व एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत, वेधले सगळ्यांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन काल रात्रीपासूनच सुरू झाले होते. बॉलीवूडचे अनेक कलाकार त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यात अभिनेता शाहरुख खान देखील सहभागी होता. तर यावेळी सलमानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने देखील पार्टीला हजेरी लावली होती.

 

सलमान खानने आजवर त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मन जिंकली आहेत. आज त्याचे अनेक चाहते वर्ग आहेत. सलमानचे खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. सलमानने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केला तेव्हा त्याचे नाव अनेक अभिनेत्रीशी सोडले गेले होते. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे संगीता बिजलानी. सलमानच्या बर्थडे पार्टीला संगीताने देखील हजेरी लावली होती यावेळेसचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

संगीता बिजलानीने 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कातील’ चित्रपटा द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर जवळपास दहा वर्ष सलमान (Salman Khan) आणि संगीता एकमेकांना डेट करत होते. त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते. मात्र काही अशा गोष्टी घडल्या की ते एकमेकांपासून दूर गेले. काल सलमानच्या पार्टीला संगीताने हजेरी लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो संगीत आणि सलमान एकमेकांना मिठी मारतात.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तर अनेकांनी संगीताच्या ड्रेसवरून तिच्यावर टीका केली आहे.
सलमान खानच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास लवकर तो ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकणार आहे.
तर ‘टायगर 3’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.
यादरम्यान सलमान खान ‘पठाण’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारणार आहे.

 

Web Title :- Salman Khan | salman khan celebrating his 57 birthday actor kisses ex girlfriend sangeeta bijlanis forhead

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra-Karnataka Border Dispute | कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर, मात्र उद्धव ठाकरेंची ‘ती’ मागणी नाकारली

Himanshi Khurana | परदेशात शूटिंग करताना ‘या’ अभिनेत्रीची प्रकृती ढासळली; रुग्णालयात करण्यात आले दाखल

Dr Jayant Khandare | रक्त चाचणीद्वारे कर्करोग चाचणी व निदान शक्य; संशोधक डॉ. जयंत खंदारे यांची माहिती