Salman Khan | मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे सलमान खानने केलं कौतुक ; म्हणाला कि…

पोलीसनामा ऑनलाईन – Salman Khan | मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुरुवारी एका घटनेची माहिती देत ट्विट केले होते की, “एक वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapped) केल्यानंतर क्राइम ब्रांच (Mumbai Police Crime Branch) युनिट 9 ने आरपीएफ सोलापूर विभागाच्या सहाय्याने आरोपींना अटक करून मुलाला सुरक्षित रित्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.” याचबरोबर मुंबई पोलिसांनी मुलाला पालकांकडे सोपवताना काही फोटो सुद्धा शेअर करत हे ट्विट शेअर केले होते. या ट्विट वरून सर्वत्र मुंबई पोलिसांचे कौतुक केले जात होते. अशातच अभिनेता सलमान खानने (Salman Khan) देखील या ट्विटवर अतिशय लक्ष वेधून घेणारे असे कमेंट केले आहे.

सलमान खानने ट्विट करत म्हटले की, “मुंबई पोलिसांचे देव भले करो. लहान मुलांचे अपहरण करणे हे सगळ्यात मोठे गुन्हे आहे. मुंबई पोलिसांना शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो दुवा करतो. ज्या कोणी हा गुन्हा केला आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर इतर सर्व मुले देखील लवकरात लवकर सापडावे आणि त्यांच्या पालकांकडे परत जाऊ दे”. असे कॅप्शन देत सलमानने मुंबई पोलिसांचे तोंड भरून कौतुक (Praises) केले आणि या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना देखील टॅग केले आहे.

सलमान खानच्या (Salman Khan) या ट्वीटला पोलिसांनी देखील ‘कौतुकासाठी धन्यवाद’ अशी प्रतिक्रिया दिली.
या घटनेतील आरोपी सोलापूरला पळाले असल्याचे कळताच मुंबई पोलिसांनी धाव घेत आरोपींना अटक करून
ही संपूर्ण कारवाई पूर्ण केली.

Web Title :-  Salman Khan | salman khan praises mumbai police for rescue a kidnapped child

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sourav Ganguly | सौरभ गांगुलीच्या BCCI अध्यक्षपदाचा वाद न्यायालयात, कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Politics | ‘रणछोडदास’ मैदान सोडून पळून गेले’, शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका