कतरिनासाठी मी ‘भाईजान’नाही : सलमान खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भारत हा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आधी प्रियांका चोप्राला संधी मिळाली होती. परंतु तिने या सिनेमाला नकार दिल्यानंतर या सिनेमासाठी सलमानने कतरीनाची मदत घेतली. सलमान आणि कतरीना यांची केमिस्ट्री चाहत्यांना भलतीच आवडते. भलेही मग ते ऑफस्क्रिन असो वा ऑनस्क्रिन. दबंग सलमान खान भाईजान म्हणून ओळखला जातो. परंतु कतरीनासाठी मात्र मी भाईजान नाही असं सलमानने सांगितले आहे. एका कार्यक्रमात तो बोलत होता.

भारतमधील एका गाण्याच्या लाँचिंगच्या कार्यक्रमादरम्यान प्रश्नोत्तरावेळी सलमानला पत्रकारांनी भाईजान अशी हाक मारली. कतरीनाने हाक ऐकली परंतु त्याकडे जास्त लक्ष दिल्याचे दिसले नाही. यानंतर सलमान लगेचच म्हणाला, “पाजी इनके लिए मैं भाईजान नही हूँ” सलमानचे हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दुसऱ्या क्षणीच लगेच पुन्हा मस्करीच्या मुडमध्ये सलमान म्हणाला, “क्या भरोसा, भाईजान भी बुला सकती है” हे बोलताना मात्र सलमान स्वत:च मोठ्याने हसताना दिसून आला. त्यानंतर सलमानच्या या उत्तरांनंतर कतरीनाला लगेच विचारण्यात आले की, तिला सलमान काय म्हणून हाक मारायला आवडेल असे तिला पत्रकारांनी विचारले. त्यावर उत्तर देत, “मेरी जान” असे कतरीना म्हणाली.

दरम्यान प्रियांकाने या सिनेमाला नकार दिल्यानंतर सलमानने अनेकदा अप्रत्यक्षरित्या तिला टोला लगावला आहे. त्याने प्रियांकाचे आभारही मानले. प्रियांकाने नकार दिल्यामुळे कतरीनाला ही भूमिका मिळाली असं सलमान म्हणाला. सलमानचा भारत हा सिनेमा 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like