नव्या प्रोजेक्टमध्ये सरदार लुकमध्ये दिसणार ‘भाईजान’ सलमान खान, आयुष शर्मा असणार सोबत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच एका सिनेमात पगडीमध्ये म्हणजेच एका सरदाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या लाल सिंह चड्ढा सिनेमामुळं बॉलिवूड स्टार आमिर खानचा पगडीवाला लुक चर्चेत आहे. चाहत्यांनाही हा लुक आवडला होता. अशात आता सलमान खानच्या पगडीमध्ये दिसण्याबद्दल चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

💪🏼 #dabangg3 #throwback

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान खान साकारणार निगेटीव रोल ?
एका इंग्रजी वृत्तानुसार, सलमान खान त्याचे जीजू आयुष शर्मासोबत एका गँगस्टर सिनेमासाठी हात मिळवण्याची शक्यता आहे. या सिनेमात तो पगडी घालून शीख माणसाच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमात त्याचा निगेटीव रोल असणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिराज मीनावाला सिनेमाचं डायरेक्शन करणार आहे. अशीही माहिती आहे की, सिनेमा याच वर्षी मे मध्ये रिलजी होण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

Promotions chalu! #Dabangg3 @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

या सिनेमासाठी सलमान खान वाढवणार दाढी ?
या सिनेमासाठी सलमान आपली दाढी वाढवण्याची शक्यता आहे. आयुष शर्मा एका नॉर्थ इंडियन गँगस्टरच्या लुकसाठी स्वत:ला आणखी मस्क्युलर करणार आहे. या सिनेमासाठी पुढील आठवड्यात लुक टेस्ट होणार आहे. सलमान हिरोज या सिनेमात अखेरचा सरदारच्या भूमिकेत दिसला होता. 2008 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

View this post on Instagram

Work in progress…

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

You might also like