ईदच्या निमित्तानं ‘भाईजान’ सलमाननं रिलीज केलं ‘भाई भाई’ गाणं ! दिला ‘हिंदू-मुस्लिम’ बंधुत्वाचा संदेश (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सलमान खानचं प्यार करोना हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं होतं. या गाण्याला खूप पसंती मिळाली होती. यानंतर आता त्याचं दुसरं गाणं तेरे बिना हे रिलीज झालं. या गाण्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर सलमान खाननं कालच (सोमवार दि 25 मे) ईदच्या निमित्तानं भाई भाई हे गाणं रिलीज केलं आहे जे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गाण्याबद्दल बोलायचं झालं तर या गाण्यात सलमान खाननं जातीय सलोखा आणि बंधुतेचा संदेश दिला आहे. साजिद वाजिदनं हे गाणं कंपोज केलं आहे. समलान खाननं हे गाणं गायलं आहे. हे गाणं सलमान खाननं दानिश सबरी सोबत मिळून लिहिलं आहे. यातील जो रॅप आहे तो रूहान अरशदनं लिहिला आहे.

सोमवारी रात्री सलमान खाननं हे गाण्याची लिंक सर्वांसोबत शेअर केली आहे. लिंक शेअर करताना सलमान खान म्हणतो, “मी तुम्हा सर्वांसाठी काही तयार केलं आहे. पाहून नक्की सांगा कसं वाटलं. तुम्हा सर्वांना ईद मुबारक.”

सलमान खाननं जशी या गाण्याची लिंक सोशलवर शेअर केली. लगेच हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसलं. अवघ्या 12 तासात हे गाणं 46 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं. आज भारताला या गाण्याची गरज आहे. असं अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे. कारण हे गाणं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य करणारं आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like