Salman Khan Threat Case | पुण्याच्या शार्पशूटरनेच ‘भाईजान’ सलमान खानला धमकी दिली ? कसून चौकशी सुरू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील दिग्दर्शक सलीम खान (Salim Khan) यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी (Salman Khan Threat Case) देण्यात आली होती.
या प्रकरणाचा संबंध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येशी (Sidhu Moose Wala Murder Case) जोडला जात होता.
त्याच प्रकरणात रविवारी (दि.12) एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या आरोपीची ही सलमान खान धमकी प्रकरणात Salman Khan Threat Case) चौकशी केली जाणार आहे.

 

सलमान खान धमकी प्रकरणाची (Salman Khan Threat Case) चौकशी (Inquiry) करण्यासाठी पोलिसांचे पथक दिल्ली (Delhi) आणि राजस्थान (Rajasthan) येथे दाखल झाले असून पथकाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
दुसऱ्या बाजूला याच प्रकरणात लॉरेन्स बिष्णोईची (Lawrence Bishnoi) देखील चौकशी सुरु आहे.
तर पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळे (Mahakal alias Saurabh alias Siddhesh Kamble) याची देखील या प्रकरणी चौकशी सुरु आहे.

दरम्यान, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडमधील संशयित शॉर्प शूटर संतोष जाधव (Santosh Jadhav)
व त्याच्या साथीदाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) गुजरातमधून (Gujarat) रविवारी अटक (Arrest) केली.
त्याला रात्री उशिरा पुण्यात आणण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर (Court) हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) मंजूर केली आहे.
अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title :- Salman Khan Threat Case | salman khan death threat siddhu moosewala murder case pune sharp shooter santosh jadhav and Mahakal alias Saurabh alias Siddhesh Kamble mumbai police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा