Salman Khan Threat Case | सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला जोधपूरमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Salman Khan Threat Case | बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या मिळत आहेत. सलमान खान याला धमकी दिल्या प्रकरणी (Salman Khan Threat Case) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानला ई-मेल करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून (Rajasthan) अटक केली आहे. धाकड राम विश्नोई (Dhakad Ram Bishnoi) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव त्याला जोधपुर (Jodhpur) येथे अटक (Arrest) केली आहे.

https://twitter.com/ANI_MP_CG_RJ/status/1639956871795671044?s=20

सलमान खाने याने याबाबत मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन 21 वर्षाच्या धाकड राम विश्नोई याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला मुंबईत आणले आहे. धडक राम विश्नोई याच्यावर पंजाबी गायक सिद्धू मूसेवालच्या (Punjabi Singer Sidhu Moose Wala) वडिलांना धमकावल्याचा आरोप आहे. सलमानला धमक्या मिळत असल्याने पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. (Salman Khan Threat Case)

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सलमानला माफी मागण्यास सांगितले होते. तसेच माफी न मागितल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी लॉरेन्स आणि त्याचा साथीदार गोल्डी यांच्याविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

 

लॉरेन्स बिश्नोई म्हणाला होती की, मी सलमान खानला धमकी दिली आहे.
त्याने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिलेली नाही. आमच्या भागात येऊन त्याने शिकार केली आहे.
त्यामुळे त्याने आता आमच्या समाजाची माफी मागावी.
पण त्याला मिळालेल्या धमकीच्या पत्राचा आणि माझा काहीही संबंध नाही, असे त्याने मुलाखतीत सांगितले होते.

 

Web Title :- Salman Khan Threat Case | salman khan threat case accused arrested from jodhpur rajasthan by mumbai police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Sanjay Shirsat | अंबादास दानवे शिवसेनेत प्रवेश करणार?, संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट

Bachchu Kadu | ‘राष्ट्रवादीची बॅनरबाजी एकप्रकारची मुर्खता’, बच्चू कडूंनी राष्ट्रवादीला सांगितला नियम

Bharati Vidyapeeth New Law College Pune | मानवी हक्कासंबंधी ‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’ला चांगला प्रतिसाद