पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या सुरक्षतेत दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे. एवढेच नाही तर सलमानला बंदुकीचा परवानाही देण्यात आला आहे. वांद्रे बँड स्टँड या ठिकाणी एका चिठ्ठीतून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता थेट त्याला ईमेल द्वारे धमकी देण्यात आली आहे. या ईमेल मध्ये गुंड बिश्नोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी त्याने एका वृत्तवाहिनीवर मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीचा देखील उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. या ईमेल द्वारे पुन्हा एकदा सलमान खानला (Salman Khan) धमकी देण्यात आल्याने आता सलमानच्या सुरक्षितेत आणखीन वाढ करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
सलीम खान हे जून 2022 मध्ये वांद्रे बँड स्टँड येथे फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना एका अज्ञात व्यक्तींनी चिट्ठी दिली आणि त्या मध्ये लिहिले होते की ‘आपकाही जल्द मुसेवाला होगा’. यामुळे सलीम आणि सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या धमकी मागे गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा हात असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण चालू असतानाच आता सलमान खानच्या एका कर्मचाऱ्याला ईमेल द्वारे धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये ‘गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से’ असे नमूद देखील करण्यात आले होते.
ईमेल प्राप्त होताच सलमानच्या (Salman Khan) कर्मचाऱ्याने वांद्रे पोलीस ठाणे येथे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
गोल्डी भाई आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधात ई-मेल पाठवल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ई-मेल मध्ये असे नमूद करण्यात आले होते की, “गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से.
इंटरव्ह्यू (लॉरेन्स बिश्नोई) देख लिया होगा उसने. अगर नाही देखा तो बोल देना देख लेना.
मॅटर क्लोज करना है तो बात करवा दियो. फेस टू फेस करना है तो बता दियो.
अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दियो, अगली बार बडा झटका देंगे” आणि हा ई-मेल rohitgarg<[email protected]> या ईमेल आयडी वरून पाठवण्यात आला होता.
आता या घटनेनंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title :- Salman Khan | threat email to actor salman khan reference of gangster lawrence bishnoi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update