जाणून घ्या कुठे होणार ‘भाईजान’ सलमानच्या ‘टायगर 3’ ची शुटींग ? मार्चमध्ये सुरू होणार प्रोजेक्टरवर काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) आणि बॉलिवूड ॲक्ट्रेस कॅटरीना कैफ (Katrina Kaif) यांचा एक था टायगर हा सिनेमा सुरपहिट झाला होता. यानंतर त्यांचा टायगर जिंदा है हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. दोन्ही सिनेमांना भरपूर प्रतिसाद मिळाल्यानंतर आता टायगरच्या तिसऱ्या पार्टची म्हणजेच टायगर 3 ची तयारी सुरू आहे.

सलमान खानच्या टायगर 3 सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, सलमान या वर्षी मार्च मध्येच या मेगाबजेट सिनेमावर काम सुरू करणार आहे.

रिपोर्टनुसार, सलमानला सिनेमातील सीन्स हे मुंबईतच शुट करायचे आहेत. त्यामुळं मकेर्स त्यांना आधीच शुट करणार आहेत. यानंतर सलमान डायरेक्ट मीडल इस्ट कडे रवाना होणार आहे. दुबईत तो काही सीन्स शुट करणार आहे.

असंही समजत आहे की, टायगर सनेमात ॲक्शनचं प्रमाण जास्त असणार आहे. अंतिम सिनेमाची शुटींग झाल्यानंतर सलमान आपल्या स्पेशल प्रोजेक्टवर काम करणार आहे. असं म्हटलं जात आहे की, पुढील वर्षापर्यंत टायगर 3 रिलीज केला जाईल.

2012 साली रिलीज झाला होता पहिला सिनेमा
2012 साली एक था टायगर सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा कबीर खाननं डायरेक्ट केला होता. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. सिनेमानं 320 कोटींची कमाई केली होती. यानंतर 2017 साली टायगर जिंदा है हा सिनेमा रिलीज झाला या सिनेमात कॅटरीना आणि सलमान पन्हा एकदा एकत्र काम करताना दिसले. याचं डायरेक्शन अली अब्बास जफर यांनी केलं होतं. आता टायगर 3 बद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. टायगर 3 च्या डायरेक्शनची जबाबदारी ही बँड बाजा बारात फेम डायरेक्टर मनीष शर्माकडे देण्यात आली आहे.