सलमानच्या दबंग ३ मध्ये ‘मुन्नी’ नाही ‘मुन्ना’ होणार बदनाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचे फॅन फॉलोईंग खूप आहे. तरुणांमध्ये सलमानची क्रेझ आहे. सलमान खानाच्या सुपरहिट ‘दबंग’ चित्रपटाचा आता तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दबंग’ चित्रपट जेवढा यशस्वी ठरला तेवढेच त्यातील ‘मुन्नी बदनाम’ हे गाणे दखील हिट ठरले आता ‘दबंग ३’ मध्ये देखील हे गाणे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण या गाण्यात थोडा ट्विस्ट आहे. यावेळी मुन्नी ऐवजी मुन्ना बदनाम होणार आहे.

दमदार डायलॉग्स, सुपरहिट गाणी आणि सलमान खान या सगळ्यामुळे ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ चित्रपट सुपरहिट ठरले. आता चाहत्यांना आतुरता आहे ती दबंगच्या तिसऱ्या भागाची. या तिसऱ्या भागात ‘मुन्ना बदनाम हुआ, डार्लिंग तेरे लिए’ असं गाणं असणार आहे आणि या गाण्यावर बॉलिवूडचा दबंग खान मनसोक्त नाचणार असल्याची चर्चा आहे.

डिसेंबर मध्ये होणार प्रदर्शित
‘दबंग ३’ मध्ये चुलबुल पांडेचे कॉलेजमधील दिवस, पोलीस बनण्याचे त्याचे स्वप्न अशा बऱ्याच गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. ‘दबंग ३’ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

You might also like