‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ मध्ये महाराजांच्या भूमिकेत सलमान खान ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत अजय देवगण दिसणार आहे, याच चित्रपटात, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार ? याबाबत अजूनही समोर आले नाहीये, मात्र शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, बजरंगी भाईजान सलमान खान दिसणार असल्याचा अंदाजा वर्तवल्या जात आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b128f3df-d377-11e8-bb41-77fbb4a850ec’]

छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंह म्हणून ओळखल्या जाणारे, वीर योद्धे तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता अजय देवगण असणार आहे, याच चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार ? हे अजूनही स्पष्ट झाले  नाहीये, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सैफाली खान साकारणार असल्याची चर्चा याआधी झाली होती, मात्र आता सैफाली खान नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत सैफाली खानने दिले आहेत. सैफ आता राजपूत योद्धा उदयभान राठोडच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे.
इतकेच नावाचे तर  यापूर्वी, रितेश देशमुखच्या ‘छत्रपती शिवाजी’ या मराठी चित्रपटात सलमान झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आणि आता शिवाजी महाराजांची भूमिका  बजरंगी भाईजान सलमान खान साकारणार असल्याचा अंदाजा वर्तवल्या जात आहे. यामुळे  शिवरायांच्या भूमिकेत सलमान खान कसा दिसेल, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

डॉल्बीचा आवाज बंदच… बंदी हटवणार नाही : हायकोर्ट

सैफाली खान साकारणार असलेली भूमिका राजपूत योद्धा उदयभान राठोड हा मुघल राजा औरंगजेबाचा किल्लेदार होता. ४ फेब्रुवारी १६७० स्वतःच्या  मुलाचे लग्न सोडून ( कोंढाणा ) सिंहगडावर स्वराज्याचा भगवा फडकवन्यासाठी झालेल्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान महाराजांच्या तोंडून एक उद्गार निघाले होते ‘ गड आला पण सिंह गेला’ त्यावेळी  कोंढाणावरुन या गडाचे नाव  ‘सिंहगड’ असे झाले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89a0246c-d378-11e8-90a3-9942e79c0f0b’]