home page top 1

भाईजान नव्हे, चुलबुल पांडे करणार ‘दबंग ३’ चे प्रमोशन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध आणि सगळ्यांचा आवडता अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘दबंग ३’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाईजान एका आगळा वेगळ्या अंदाजाचा वापर करणार आहे. सगळ्यांना नक्कीच उत्सुकता लागली आहे की, सलमान नेमकं काय करणार ? चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान चक्क चुलबुल पांडे बनून येणार आहे. ही माहिती सलमान खानने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

View this post on Instagram

Work in progress…

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

अभिनेता सलमान खानने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ‘जब चुलबुल पांडेसे जुडे है सारे इंडिया के इमोशन्स, फिर सलमान खान क्यु करेंगे ‘दबंग’के प्रमोशन्स ?’ असा प्रश्न करत भाईजान सगळ्यांना भेटतो. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात जसे की, सलमान खानसोबत नेहमीच हिरोईनच्या भूमिकेत वेगळा चेहरा समोर येत असतो. तसेच यंदाही चाहत्यांना सलमान खानसोबत वेगळ्या चेहऱ्याचे दर्शन होणार आहे. हा नवीन चेहरा म्हणजे अभिनेत्री सई मांजरेकर. सई मांजरेकर ही दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. ‘दबंग ३’ मधून सलमानसोबत सई शानदार पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सई सलमानच्या प्रियसीच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांवर एक गाणे चित्रीत केले जाणार आहे.

View this post on Instagram

Woh mere peche wire kis cheez ka hai . . Can u guess pls?

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सलमान खान आणि सई या दोघांच्या जोडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. सईची बॉलिवूडमधली ग्रॅंड एन्ट्री पाहून बॉलिवूडसह मराठी सिनेजगतात यांचे कौतुक होत आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like