‘खिलाडी’ अक्षयमुळं ‘भाईजान’ सलमानच्या अडचणीत ‘वाढ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवू़ड स्टार अक्षय कुमार आणि सलमान खान यांचे अनेक मोठे सिनेमे यावर्षी पहायला मिळणार आहेत. अक्षय कुमारचे लक्ष्मी बॉम्ब, सूर्यवंशी असे दोन सिनेमे रिलीज होणार आहेत तर सलमान खानचा राधे हा सिनेमा ईदला रिलीज होणार आहे. आता अक्षय कुमारमुळे सलमान खानच्या अडचणी वाढल्या आहेत. नेमकं काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊयात.

अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा सलमान खानचा राधे हा सिनेमा एकाच दिवशी रिलीज होत असल्याचं समजत आहे. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर एकमेकांच्या आमने सामने येणार आहेत. राधे सिनेमाच्या मेकर्सनं आधीच रिलीज डेटबद्दल सांगितलं होतं. यानंतर आता अक्षयचा सिनेमा देखील ईदलाच रिलीज होणार असल्याचं समजत आहे.

सलमान खानचा राधे सिनेमा त्यावेळी रिलीज होणाऱ्या सिनेमांवर भारी पडण्याची शक्यता आहे. कारण राधे सिनेमाचं वितरण यशराज फिल्म्स करणार आहे. खास बात अशी की, सलमान खान प्रत्येक ईदच्या दिवशी त्याचा सिनेमा रिलीज करत असतो. या दिवशी रिलीज झालेला त्याचा सिनेमा चांगली कमाई करत असतो.

तसं पाहिलं तर सलमान खानच्या सिनेमांवर अक्षयचे मागील वर्षी रिलीज झालेले सिनेमे सरस ठरले आहेत. त्यामुळे आता समलानच्या अडचणी वाढणार आहेत असं दिसत आहे. दरम्यान रिलीज डेटबद्दल नेमकं माघार कोण घेतं किंवा मग दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार आहेत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

You might also like