पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाबाबत नागरिकांकडून निष्काळजीपणा बाळगला जात असल्यामुळे चंदेरी दुनियातील राजा अर्थात भाईजानची सटकली आहे. त्यासंदर्भात सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये भाईजान सर्वांवर नाराज असलेला पाहायला मिळत आहे.
#IndiaFightsCorona @CMOMaharashtra @mybmc @AUThackeray @Iamrahulkanal pic.twitter.com/l9qPAPs88U
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2020
देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान पाहायला मिळत आहे. चीनपासून सुरू झालेल्या या व्हायरसनं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतातही या व्हायरसचे 360 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसवर कोणत्याही प्रकारचे औषध नाही. त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी गर्दीपासून लांब राहणं, स्वतःची स्वच्छता राखणं, अशा सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे. अशाअनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनापासून वाचण्यासाठी शक्य ते उपाय करण्याचे आणि स्वतःची काळजी घेण्याची विनंती करताना दिसत आहेत. सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये भाईजान सर्वांवर नाराज असलेला पाहायला मिळत आहे. सलमान खाननं त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो सर्वांवर रागावलेला दिसत आहे. याचं कारण आहे सध्या देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना लोकांचा निष्काळजीपणा. सलमानने त्याच्या या व्हिडीओमधून लोकांना त्यांच्या सुरक्षेकडे गंभीरतेने पाहण्याचा सल्ला दिला आहे.