पुतण्या योहानचा बर्थडे सलमान खानकडून ‘हटके’ साजरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खानचा भारत सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. भारतला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलमान नेहमीच सोशलच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. सध्या सलमानचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत सलमान खान, सोहेल खान आणि सलमानचा पुतण्या सोहेलचा मुलगा योहान (Yohan) दिसत आहे. हा व्हिडीओ योहानच्या वाढदिवशीचा आहे. योहान 8 वर्षांचा झाला आहे. सलमान खान आणि सोहेल खानचा योहानचा वाढदिवस साजरा करण्याचा अंदाज इतका शानदार आहे की, हा व्हिडीओ सोशल झपाट्याने व्हायरल होत आहे.

सलमान खानने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ साठी सलमानने खूप मजेदार असं कॅप्शन दिलं आहे. ज्यातून सलमानने योहानला जीवनासाठी उपदेशही केला आहे. सोहेल खान एका बीन बॅगवर झेप घेतो आणि दुसऱ्या बाजूला योहान बसलेला आहे. सोहेलने मारलेल्या उडीमुळे बॅगवर प्रेशर पडतो आणि दुसऱ्या बाजूला बसलेला योहान हवेत उडतो. पुढे सलमान उभा आहे आणि तो योहानला हवेतच झेलतो आणि कडेवर घेतो. असा रीतीने खूप शानदार अंदाजात योहानचा वाढदिवस साजरा झाल्याचे दिसत आहे.

सलमान खानने हा व्हिडीओ पोस्ट केला आणि क्षणातच हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खानचा भारत सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. एका तासातच या व्हिडीओला 12 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

Loading...
You might also like