‘त्या’ युवा नेत्यावर ‘तांडव’ चित्रपट ; सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या कन्हैयाकुमारच्या जीवनावर ‘तांडव’ नावाचा चित्रपटाची निर्मिती सुरु करण्यात आली आहे. चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता सलमान खान कन्हैयाकुमारच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जेएनयूतील तथाकथित देशद्रोहाचे प्रकरण ते बेगुसराय लोकसभा निवडणूक असा प्रवास दाखवण्यात येणार असून कन्हैयाच्या जीवनातील आतापर्यंतच्या महत्वाच्या घटना चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत.

या सिनेमाचं दिग्दर्शन अब्बास जफर करणार आहेत. या चित्रपटासाठी सलमान खान बेगुसरायला जाणार आहे. सलमान खान बेगुसरायमध्ये काही दिवस राहून तेथील जीवनशैली समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या भूमिकेसाठी सलमान खान वजन कमी करत असून बिहारच्या विशिष्ठ शैलीतील हिंदी भाषा आत्मसात कारण्याठी प्रयत्न करत आहे. चित्रपटात कन्हैयाकुमारचा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष ते लोकसभा उमेदवार हा संपूर्ण प्रवास दाखवला जाणार आहे.

दरम्यान, कन्हैयाकुमार सीपीआयच्या तिकिटावर बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या जागेवर त्याचा सामना भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह आणि आरजेडीचे उमेदवार तन्वीर हसन यांच्यासोबत होणार आहे. बेगुसरायच्या या निडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like