सलमान करणार ‘या’ चित्रपटाचा रिमेक

 मुंबई : वृत्तसंस्था – सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे रिमेक येत आहेत. बॉलिवूडच्या आणखी एक सुपरस्टारला चित्रपटाचा रिमेक करायचा आहे. हा सुपरस्टार म्हणजे सलमान खान….याला हिंदी चित्रपटाचा रिमेक करण्यात रस नसला तरी त्याच्या एका जुन्या चित्रपटाचा बॉलिवूडमधील नवीन अभिनेत्यानी रिमेक करावा अशी सलमानची इच्छा आहे.

एका मुलाखतीत सलमानला रिमेकबाबत विचारण्यात आले. यावर तो म्हणाला की, ‘मला सध्यातरी कोणताच रिमेक करायचा नाही. पण १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह’ चित्रपटाचा एखादा नवीन अभिनेत्याने रिमेक केला तर मला आवडेल. हा चित्रपट खूप सुंदर आहे. असे मला वरुण धवनने देखील सांगितले होते.’

पुढे सलमान म्हणाला की, ‘माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीला मी हा चित्रपट केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमी कमाई केली होती पण. हा चित्रपट माझ्या खुप आवडीचा आहे. त्या चित्रपटांमध्ये माझी भूमिका छान होती.’

सध्या सलमान ‘भारत’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत काम करत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. ‘भारत’ नंतर सलमान ‘दबंग ३’ या चित्रपटात दिसणार आहे.

Loading...
You might also like