सलमान खानचा पुतण्या अब्दुल्ला खानचं 38 व्या वर्षी मुंबईत निधन

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. अशात बॉलिवूड स्टार सलमान खानच्या कुटुंबातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. सलमान खानचा पुतण्या अब्दुल्ला खान(38) याचं निधन झालं आहे. अब्दुल्ला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात भरती झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्लाच्या फुफ्फुसात संक्रमण झालं होतं. दोन दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अब्दुल्लाचा मृत्यू झालाचा समजताच सलमान खानसहित पूर्ण कुटुंब दु:खात आहे.

असंही सांगितलं जात आहे की, दीर्घकाळापासून अब्दुल्ला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात भरती झाला होता. त्याच्या फुफ्फुसात संक्रमण झालं होतं. सलमान खाननं ट्विट सकरत अब्दुल्लाबद्दल माहिती दिली आहे. सलमान अब्दुल्लाचा आणि त्याचा एक फोटो शेअर केला आहे आणि श्रद्धांजली दिली आहे.

सलमान खाननंतर अ‍ॅक्टर राहुल देवनंही ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. या दु:खाच्या काळात देवानं समलान आणि त्याच्या कुटुंबियांना हिंमत द्यावी असं त्यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. अनेक चाहते आहेत ज्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

अब्दुल्ला अनेकदा सलमान खानच्या जीम व्हिडीओजमध्ये दिला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खाननं एक व्हिडीओ शेअर केला होता तो अब्दुल्लाला उचलून घेताना दिसला होता

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like