सलमान करणार महेश मांजरेकर यांच्या मुलीला लॉन्च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आजपर्यंत सलमानने ज्या ज्या अभिनेत्रीला बॉलिवूड इंडस्ट्रीत आणले आहे तिचे करिअर सेट झाले आहे असे आतापर्यंत इतिहास सांगतो. काही दिवसांपूर्वी जॅकलिन फर्नांडिसने देखील सलमानमुळे माझ्या करिअरला दिशा मिळाली असे सांगितले होते. आता सलमान खान महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी मांजरेकर हिला बॉलिवूड इंडस्ट्रीत आणतो आहे. दबंग -३ मध्ये अश्वमीला लॉन्च केले जाणार असल्याची चर्चा आहे.

आता महेश मांजरेकरची मुलगी अश्वमीला सलमान ब्रेक देणार असल्याची चर्चा जोरदार आहे. दबंग -३ च्या निर्मात्यांना या सिनेमासाठी आणखी एक अभिनेत्री हवी होती. याआधी मौनी रॉयचे नाव चर्चेत होते. मात्र मौनीने नकार दिल्यानंतर अश्वामी मांजरेकर या सिनेमात दिसणार आहे.

सलमान आणि महेश यांची पक्की यारी

अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर यांची चांगली मैत्री आहे. महेश मांजरेकर यांची मलंगी बॉलिवूड मध्ये काम करू इच्छिते असे जेव्हा सलमान खानला कळले तेव्हा लगेच सलमानने तिला लॉन्च करण्याचे प्लानिंग बनवले .अश्वमीची भूमिका या सिनेमात कोणती असेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नसली तरीही सोनाक्षीच्या बरोबरीचा रोल तिला देण्यात आल्याचं बोललं जात आहे.

अश्वमी महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा यांची मुलगी आहे. 29 ऑगस्ट 1988 ला जन्मलेल्या अश्वमीला सत्या नावाचा भाऊही आहे. महेश मांजरेकरांनी दुसरं लग्न मेधा मांजरेकर यांच्याशी केलं. त्यांना सई नावाची एक मुलगीही आहे. अश्वमीचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस आहे ज्याचं नाव अश्वमी फिल्म्स प्रा. लिमिटेड आहे.